Chakan Crime News: चाकण मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी (दि. 28) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पहिल्या घटनेत अनिकेत बाळासाहेब नाणेकर (वय 23, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. नाणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची लाल रंगाची क्लासिक बुलेट (एम एच 14 / जी टी 8777) 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेटचे लॉक तोडून बुलेट चोरून नेली. 26 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

दुस-या घटनेत विनोद धोंडीराम सूर्यवंशी (वय 30, रा. सोसरी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची लाल रंगाची पल्सर (एम एच 14 / एच आर 4721) 26 ऑगस्ट रोजी दुपारी मेदनकरवाडी येथील आळंदी फाट्यावर एका हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

तिस-या घटनेत सतीश ज्ञानदेव महाडिक (वय 38, रा. झगडे वस्ती, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन प्लस (एम एच 14 / बी पी 8546) 26 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता महाळुंगे येथील ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे प्रा. ली. या कंपनीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.