Chakan Crime News : कंपनीच्या गोदामासमोरुन तीन लाखांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोदामासमोर ठेवलेला दोन लाख 80 हजारांचा माल चार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी पहाटे वाघजाईनगर, खराबवाडी येथे टोरंट गॅस पुणे लिमिटेड या कंपनीत घडली.

सुनील मधुकर साखरे (वय 40, रा. खराडी, पुणे. मूळ रा. परभणी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखवळ करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघजाईनगर खराबवाडी येथे टोरंट गॅस लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या गोदामासमोर मोकळ्या जागेत ठेवलेले चार स्टीम बॉल वॉल चार अनोळखी चोरटयांनी चोरून नेले. एका स्टीम बॉल वॉलची किंमत 70 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.