Chakan crime News : चाकण, भोसरी परिसरातून तीन वाहने लंपास

एमपीसी न्यूज – चाकण आणि भोसरी परिसरातून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत सोमवारी (दि. 5) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमोल सोनू हेमाडे (वय 43, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांची 17 हजारांची दुचाकी (एमएच 15 / बीजी 3842) निघोजे येथील हॉटेल कार्निवलच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुगुटराव शिवराम शेडगे (वय 53, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / ईए 4356) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरून चोरून नेली. हा प्रकार 26 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सचिन सदाशिव मोरे (वय 43, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोरे यांनी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी (एमएच 14 / एफवाय 9938) एमआयडीसी भोसरी येथील इंद्रायणीनगर कॉर्नरवर एका हॉटेलसमोर पार्क केली.

त्यानंतर ते  मित्रासोबत पिंपरी येथे गेले. रात्री साडेआठ वाजता ते परत आले असता त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.