Chakan Crime News : उघड्या दरवाजावाटे चोरट्यांनी एक लाखाचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने एक लाख दोन हजार रुपये किमतीचे 44 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. ही घटना चार जुलै रोजी देशमुख आळी, चाकण येथे घडली.

दीपक गणपत शिंदे (वय 32, रा. देशमुख आळी, चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे चार जुलै रोजी सकाळी दहा वाजता गावी गेले होते. दरम्यान त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता.

अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे नेकलेस, राणीहार, बदाम व चैन, असे एकूण 1 लाख 2 हजार रुपये किमतीचे 44 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी शिंदे घरी आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.