Chakan Crime News: टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पोलिसांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज – कोयते, दांडके घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.तसेच एका दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री दहा वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी मधील खंडोबामाळ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रोहन घोगरे, मोनेश घोगरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह नाम्या उर्फ नामदेव नाईक, प्रवण शिंदे, टील्या घोडके, अभिषेक घोडके, प्रतिक सोनवणे आणि त्यांचे इतर पाच ते सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरज जोगेंद्र चौधरी (वय 22, रा. खंडोबामाळ, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सर्व आरोपी फिर्यादी चौधरी यांच्या घरासमोर आले.

बेकायदेशीर जमाव जमवून हातात कोयते, दांडके, दगड घेऊन आरडाओरडा केला. ‘खंडोबामाळचा एकच भाई रोहन घोगरे’ असे मोठमोठ्याने ओरडून आरोपी रोहन याने दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर फिर्यादी यांच्या मित्राच्या बाजूने दगडफेक करून त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. पोलिसांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.