Chakan Crime News : चाकण, चिखलीतून दोन दुचाकी, आळंदीमधून कारचा सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण, चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर आळंदी मधून एका कारचा सायलेन्सर चोरून नेला आहे. वाकड परिसरात देखील एक चोरीचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्याने मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
विवेक विनयकुमारपुरी भास्कर (वय 31, रा. मिलिंदकॉलनी, विशालनगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या घरात अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून घरातून 10 हजारांचा एक मोबाईल फोन आणि 15 हजारांचा एक लॅपटॉप चोरून नेला.
एकनाथ कुंडलिक मांडेकर (वय 42, रा. आंबेठाण गाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची 10 हजारांची दुचाकी त्यांनी बैल बाजार चाकण येथे लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी नऊ ते अकरा वाजताच्या सुमारास घडला.
राजाभाऊ बिभीषण तिडके (वय 27, रा. साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आला.
अमोल विष्णू कारंडे (वय 30, रा. घोलपवस्ती, च-होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची इको कार मरकळ रोडवर जान्हवी भक्त निवास येथे पार्क केली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कारचा 40 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर काढून चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.