Chakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवरून जाणारे दोघेजण रस्त्यावर पडले. त्यातील एकाच्या अंगावरून कंटेनर चालवून कंटेनर चालक कंटेनरसह पळून गेला. कंटेनरखाली चिरडलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी साडेअकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाजवळ घडली.

मोबीन अब्दुलगनी डांगे (वय 33, रा. कुरुळी फाटा, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दुचाकीवरील सहप्रवासी ब्रह्मा अंकुश घोंनसे (वय 32, रा. कुरुळी फाटा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर (एच आर 38 / डब्ल्यू 4216) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रह्मा आणि त्यांचा मयत मित्र मोबीन हे दोघेजण शनिवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरून मोपेड दुचाकीवरुन (एम एच 14 / एफ एच 7056) जात होते. कुरुळी गावच्या हद्दीत एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील ब्रह्मा आणि मोबीन हे दोघेही खाली पडले.

मोबीन यांच्या अंगावरून कंटेनर गेला. त्यात चिरडून मोबीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी ब्रह्मा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती न देता कंटेनर चालक कंटेनरसह पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.