Chakan Crime News: ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीतून पाऊण लाखांचे साहित्य चोरणाऱ्या दोन कामगारांना अटक

एमपीसी न्यूज – खालुम्ब्रे येथील ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीत काम करणा-या दोन कामगारांनी कंपनीतून 76 हजार 892 रुपयांचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली.

राम दत्तात्रय अजबे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे), विशाल बापूराव मोहिते (वय 24, रा. माळकरंजा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मनोज सूर्यकांत निघोजकर (वय 36, रा. भैरवनगर, धानोरी, ता. हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खालुम्ब्रे येथील ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीत कामाला होते. दोघांनी मिळून कंपनीतून 76 हजार 892 रुपयांचे चार पार्ट कंपनीच्या परवानगीशिवाय चोरून नेले.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी नोघोजकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.