Chakan crime News : अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ‘झेब्रा क्रॉसिंगवरून’वरून रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 6 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पुणे-नाशिक रोडवर चाकण चौकात घडला. मृत तरुणाची ओळख पटलेली नाही.

मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस नाईक ज्ञानेश्वर काशिनाथ सातकर यांनी 12 ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर रोजी पुणे-नाशिक रोडवर चाकण चौकात झेब्रा क्रोसिंगवरून एक तरुण रस्ता ओलांडत होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने तरुणाला धडक दिली.

यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच धडक देणा-या वाहनाचा देखील अद्याप शोध लागलेला नाही.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.