Chakan Crime News : कोरोना उपचारासाठी अवाजवी बिल आकारणी, डॉक्टरांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कोरोना उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिल वसूल करणाऱ्या चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल डॉक्टरांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 ते 9 सप्टेंबर 2020 दरम्यान चाकणमध्ये हा प्रकार घडला.

याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गणपत ढवळे (वय 58) यांनी शनिवारी (दि.29) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. सीमा गवळी व डॉ. घाटकर यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलने उपचाराचे बिल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक वसूल केले. याबाबत फिर्यादी वैद्यकीय अधीक्षक यांनी हॉस्पिटल संचालकांना रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे परत करण्यास वारंवार सांगितले पण, संचालकांनी पुष्पा विजय पोखरकर यांची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.