Chakan Crime News : कंपनीचे पत्रे बदलताना वरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी नेलेला कामगार काम करताना 40 फूट उंचीवरून खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर आणि कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमद शफिक (वय 22, रा. भिवंडी) असे या दुर्घटनेतील मृत कामगाराचे नाव आहे.

कॉन्ट्रॅक्टर रुदल यादव, सुपरवायझर विष्णुदेव रंगलाल शर्मा, कंपनी मालक राकेश जयभगवान गोयल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जुरेज अहमद अब्दुल हफीज मनिहार (वय 21, रा. भिवंडी, जि. ठाणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईकाला 7 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील सुपर ऑटो कंपनीचे जुने पत्रे बदलून नवीन पत्रे टाकायचे आहेत, या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर रुदल यादव याने नेले. कॉन्ट्रॅक्टर रुदल यादव, सुपरवायझर विष्णुदेव शर्मा आणि कंपनी मालक राकेश गोयल यांनी फिर्यादी यांच्या नातेवाईकाला 40 फूट उंचीच्या पत्र्यावर चढवले.

तिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न पुरवता आरोपींनी हयगय केली. दरम्यान काम करत असताना अपघात झाला आणि फिर्यादी यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.