Chakan crime News : निघोजे येथील कंपनीतून 97 हजारांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या कंपाउंडवरून चढून कंपनीतून 97 हजार 188 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 25) पहाटे चार वाजताच्या सुमारास निघोजे गावातील एम प्लस इंजिनिअरिंग या कंपनीत घडली.

शैलेश विश्वनाथ वर्पे (वय 26, रा. मोशी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्पे काम करत असलेल्या एम प्लस इंजिनिअरिंग या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कंपनीच्या कंपाउंडवरून उडी मारून व कंपनीच्या पाठीमागील बाजूची खिडकी उचकटून आत प्रवेश केला.

त्यानंतर कंपनीतून चोरट्यांनी फ्लो मीटर, वेल्डिंग मशीन केबल, गॅस फ्रीहिटर, गॅस कटर, होस पाईप, मशीन वेल्डिंग टॉर्च केबल, अर्थिंग केबल, रेग्युलेटर, अल्युमिनियम ब्लॉक, कॉपर ब्लॉक असे एकूण 97 हजार 188 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.