Chakan Crime News : पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी वाघजाईनगर फाटा, खराबवाडी येथे करण्यात आली.

अभिनवकुमार राजबहादूर वती (वय 26, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघजाईनगर फाटा, खराबवाडी येथे एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत आरोपी अभिनवकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी 50 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करत आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक डेरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.