Chakan Crime News : रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तृतीयपंथीला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण करून रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका तृतीयपंथीला कारमधून आलेल्या चार अनोळखी लोकांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री पावणेदहा वाजता एचपी चौक, महाळुंगे येथे घडली.

जाहीद ऊर्फ झोया आश्रफ शेख (वय 28, रा. वैदवाडी, हडपसर) यांनी याबाबत सोमवारी (दि. 6) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी रात्री एचपी चौकाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते हॉटेलच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी एका कार मधून चारजण आले. काहीही कारण नसताना आरोपींनी नटबोल्ट खोलण्याच्या पान्ह्याने डोक्यात मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.