Chakan crime News : हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ; सासरच्या सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ (Marital harassment)  करणाऱ्या सासरच्या सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात (chakan Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती कैलास सदाशिव झुंजारे, दीर दयानंद सदाशिव झुंजारे, दीर शिवाजी सदाशिव झुंजार, दीर तुळशीराम सदाशिव झुंजारे, सासू आणि दोन नणंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 9 जून 2020 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत नांदेडमधील उमरी तालुक्यातील मनूर, हवेली तालुक्यातील तळवडे आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडला आहे.

विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांना हुंडा दिला नाही. तसेच सासरच्या लोकांचा व्यवस्थित मानपान केला नाही, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण केली. तिला उपाशी ठेऊन तिचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.