Chakan Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे पैशांची आणि एक एकर जमिनीची मागणी करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 22 एप्रिल 2019 पासून 29 सप्टेंबर 2020 या कालावधीत खेड तालुक्यातील रासे गावात घडला. याबाबत 2 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुराज सदाशिव शिंदे, मंदाकिनी सदाशिव शिंदे, सदाशिव बजरंग शिंदे, सपना दीपक दरेकर, अल्पना संदीप थोरात, पूजा दीपक वाबळे, तृप्ती नवनाथ सातकर, बायडाबाई लोणारी (सर्व रा. रासे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पैशांची व एक एकर जमिनीची तसेच पगाराची मागणी केली.

सासरच्या लोकांच्या मागण्या विवाहितेने पूर्ण न केल्याने त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1