Chakan Crime News : चाकण येथील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – खंडोबा माळ चाकण येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी करण्यात आली.

पोलीस हवालदार सुनिल जगन्नाथ शिरसाठ यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबामाळ चाकण येथे काहीजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.

त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने खंडोबामाळ येथील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यामध्ये पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.