Chakan Crime News : कंपनीच्या खिडकीचे गज कापून तीन लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कंपनीतून तीन लाख 12 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत 30 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद बाळासाहेब पाटील (वय 34, रा. भोसरी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदिती पावर इक्यूपमेंट्स प्रा. ली. या कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर, ऑफिस आणि शॉप फ्लोअर मधून एकूण तीन लाख 12 हजार 50 रुपयांचा माल चोरून नेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.