Chakan Crime News : विना परवाना पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विना परवाना एक पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे जवळ बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने बुधवारी (दि.23) रात्री दहाच्या सुमारास चाकण- शिक्रापूर रोडवर ही कारवाई करण्यात आली.

स्वप्निल संजय शिंदे (वय 29, रा. रासे, खेड) व गौरव मच्छिंद्र डोंगरे (वय 22, रा. चाकण), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींनी एक पिस्तूल व तीन जिवंत काडतूसे विना परवाना जवळ बाळगली. याबाबत माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याजवळून 82 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.