Chakan Crime : सामायिक क्षेत्रातून ट्रॅक्टर नेल्याने दोघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज : सामायिक क्षेत्रातून ट्रॅक्टर नेल्याने (Chakan Crime) दोघांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना चाकणमधील मोहितेवाडी येथे घडली. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी शशिकांत प्रकाश मोहिते (वय 27) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वाल्मिकी सहादु मोहिते आणि महेश वाल्मिकी मोहिते अशी आरोपींची नावे आहेत.

Moshi News : त्रिवृक्षसंगम दत्तमंदिराच्या वतीने महिलांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश मोहिते हा आपल्या ट्रॅक्टरमधून शेतात चालला होता. यावेळी वाल्मिकी आणि महेशने त्याला पाहून शिवीगाळ करत तुला बघून घेऊ असे म्हंटले. यावर प्रकाशने जे काय आहे ते आताच बघून घ्या असे प्रतिउत्तर दिल्यावर वाल्मिकीने दगड उचलून प्रकाशला मारला त्यामुळे तो बेशुद्ध पडला.

प्रकाश बेशुद्ध पडल्याचे समजताच त्याची आई तेथे आली (Chakan Crime) असता वाल्मिकीने तिलाही लाथेने मारहान करत शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.