Chakan crime : रिक्षा चालकांकडून टपरी चालकाला हप्त्याची मागणी करत मारहाण

एमपीसी न्यूज :  महिन्याला हजार रुपये हप्ता दे म्हणत रिक्षा चालक व त्याचे दहा ते बारा साथीदार यांच्याकडून टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. (Chakan crime) हा प्रकार चाकण येथे पुणे-नाशिक रोडवर शनिवारी (दि.24) ते सोमवारी (दि.26) या कालावधीत घडली.

कृष्णा शांताराम शिंदे (वय 24 रा. चाकण) यांनी फिर्याद दिली असून किशोर पाटील (वय 23 रा. चाकण) व मेहबुब मकबुल नदाफ (वय 21 रा.चाकण) व त्यांचे दहा ते बारा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील किशोर व मेहबुब यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Breaking News : कोंढवा परिसरातून पीएफआयचे 6 जण चौकशीसाठी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ जयेश कांतीलाल पवार बसले असताना आरोपी किशोर व नदाफ तेथे आले व त्यांनी पैशांची मागणी करून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. तसेच सोमवारी ही आरोपी त्याच्या 12 साथीदारांना घेऊन टपरीवर आला मात्र तेथे फिर्यादी नव्हते त्यावेळी त्यांनी फिर्यादीला मारहाण करून पानटपरी फेकून दिली. (Chakan crime) महिन्याला हजार रुपये हप्त द्या नाही तर टपरी जाळून टाकेन अशी धमकी देत दहशत निर्माण केली. यावरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.