Chakan Crime : लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर वारंवार (Chakan Crime) लैंगिक अत्याचार केला. ही घटना 22 जून ते 27 जुलै या कालावधीत खालूंब्रे येथील एका कंपनीत, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आणि ठाणे येथे घडली.

अश्विन बंडू चव्हाण (रा. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या ओरपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Akurdi : आकुर्डी येथे गुटखा विकणाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू मला खूप आवडतेस, आपण पळून जाऊन लग्न करू. मी तुला सुखात ठेवीन’ असे आश्वासन देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर दररोज लैंगिक अत्याचार केला. फिर्यादी यांच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन लग्न (Chakan Crime) न करता कोठेतरी निघून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.