Chakan Crime: ….म्हणून तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात केला विष प्राशन करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यात एका तरुणीने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज (रविवारी, दि. 20) दुपारी घडला आहे. पोलिसांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला नसल्यामुळे एका तरुणावर कारवाई केल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात येऊन विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे.

किरण पडवळ (वय 27, रा. चाकण) असे विष प्राशन करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी याबाबत माहिती दिली. चाकण शहरातील महात्मा फुले चौकात चाकण पोलीस सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून मास्क न लावता जात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडवून आणि त्याच्यावर कारवाई केली.

पोलीस संबंधित तरुणावर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई करत होते. त्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान त्या तरुणाने कुणालातरी फोन केला. फोन केल्यानंतर तरुणी किरण चाकण पोलीस ठाण्यात आली. तिने तिच्यासोबत आणलेले विष पिण्याच्या प्रयत्न केला. तिची प्रकृती आता उत्तम आहे.

दरम्यान, या प्रकरणाला विदाऊट मास्कची कारवाई हे निमित्तमात्र आहे. चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने तिला एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 50 हजार दिले. राहिलेले दोन लाख देण्यास विलंब लावल्याने जाणीवपूर्वक पोलीस मला आणि माझ्या नातेवाईकांना टार्गेट करत असल्याचा आरोप किरणने केला.

तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आपण पोलीस ठाण्यात विष प्राशन करण्याचा प्रयत्न असल्याचेही तरुणीने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.