Chakan Crime : हातभट्टी दारू तयार करणा-या भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठी सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 8 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फकीर हसन पटेल (वय 36, रा. कात्रज), दीपक मधुकर करे (वय 23, रा. काळेवाडी), नागेश जगन्नाथ सूर्यवंशी (वय 24, रा. भाटनगर,पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार सुनील जगन्नाथ शिरसाट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणीनदीच्या काठावर काहीजण गावठी दारू तयार करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, रोख रक्कम, मोबईल फोन, दोन कार असा एकूण 8 लाख 13 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.