Chakan Crime : देशी, विदेशी चलनासह कंपनीत 3 लाख 39 हजारांची चोरी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – खराबवाडी येथील एका कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी देशी, विदेशी चलन, केबल वायर आणि अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.

दीपक जगन्नाथ हासे (वय 40, रा. चाकण, मूळ रा. चिखली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 20) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हासे यांची खराबवाडी येथे अ‍ॅकवेल ऑटोमोटिव्ह प्रा. ली. ही कंपनी आहे. गुरुवारी सकाळी हासे घरी असताना त्यांना कंपनीतील सुरक्षा रक्षकाचा फोन आला. सुरक्षा रक्षकाने कंपनीत चोरी झाल्याचे सांगितले. हासे यांनी कंपनीत जाऊन बघितले असता अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या कंपाउंडची खिडकी उचकटून आत प्रवेश केला होता. कंपनीतील केबल, इतर साहित्य तसेच कंपनीची तिजोरी तोडून त्यातून देशी, विदेशी चलन असे एकूण 3 लाख 39 हजार 223 रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.