Chakan Crime: विनयभंगाची पोलिसात तक्रार केल्यास जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जबरदस्तीने घसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली.

हा प्रकार 31 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे घडला. नंदकिशोर गुंड (पूर्ण नाव माहिती नाही, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने दहा दिवसानंतर मंगळवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी जबरदस्तीने घरात आला. त्याने घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन पीडित महिलेला ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’ म्हणत तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने आरोपीला विरोध केला. त्यानंतर आरोपीने महिलेला ‘तुझ्याकडे व तुझ्या नव-याकडे बघून घेतो, तू पोलिसात तक्रार केली तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल’ अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.