Chakan Crime : ट्रक अडवून चालकाला लुटले; दोघांना अटक

0

एमपीसी न्यूज – मालवाहू ट्रकला अडवून चालकाला लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री 11 वाजता तळेगाव-चाकण रोडवर चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

नितीन सुभाष जाधव (वय 24, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. वाशीम), विशाल कैलास पवार (वय 20, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रविण कुमार विजयसिंग (वय 24, रा. उत्तर प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. ते त्यांचा ट्रक तळेगाव-चाकण रोडने घेऊन जात होते. चाकण येथे चोरटे रिक्षातून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या ट्रकला थांबवले. त्यानंतर जबरदस्तीने ट्रकच्या कॅबीनमध्ये येऊन बॉनेटवर ठेवेलेले 5 हजार रुपये आणि मोबईल फोन असा 10 हजारांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.