Chakan Crime : चाकण, वाकड मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण मधून सुमो गाडी तर वाकड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैभव सदाशिव खराबी (वय 36, रा.खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची दीड लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाची टाटा सुमो गाडी (एम एच 14 / सी एक्स 2306) अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 19 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते 20 नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

मोहनलाल मुळाराम चौधरी (वय 38, रा. वाघमारे चाळ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चौधरी यांची 15 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / सी क्यू 8638) त्यांनी वाकड येथील मधुपुष्पा सोसायटी जवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजताच्या सुमारास दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.