मंगळवार, जानेवारी 31, 2023

Chakan : कडाचीवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त गर्दी

एमपीसी न्यूज : चाकण जवळील कडाचीवाडी (Chakan) येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त गणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेश जयंती निमित्त सकाळी 7 ते 9 श्रींचा अभिषेक करण्यात आला.

सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत कीर्तन सेवा आयोजित केली होती. सकाळी साडे अकरा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

Bhosari News : …तरच देशाची प्रगती – देवेंद्र फडणवीस

मंदिरावर नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराबाहेर हार प्रसादांची तसेच खेळणी साहित्यांची दुकाने थाटली होती. येथील सोहळा कार्यक्रमाचे आयोजक गणेश नगर मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ कडाचीवाडी हिंदमाता मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, बापदेव मित्र (Chakan) मंडळ, कडाची वाडी सर्व महिला/पुरुष भजनी मंडळ व गणेश भक्त हे होते.

Latest news
Related news