Chakan : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Cyclist seriously injured in car crash : पोलिसांनी एमएच 14 / जीए 8893 या क्रमांकाच्या कार वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला

एमपीसी न्यूज – कारने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी दोन वाजता नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.

विक्रमसिंग सुरेश सिंग (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एमएच 14 / जीए 8893 या क्रमांकाच्या कार वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रमसिंग आणि त्यांचा मित्र मनोजसिंग हे दोघे दुचाकीवरून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास चाकणकडे जात होते.

ते नाणेकरवाडी येथील सूर्या हॉस्पिटलसमोर आले असता एमएच 14 / जीए ही कार पाठीमागून भरधाव वेगात आली. कारने विक्रमसिंग यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली.

यामध्ये विक्रमसिंग रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या हातापायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.