Chakan : भामा नदीपात्रात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- वाकी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील भामा नदीच्या पात्रात शनिवारी ( दि. 20 ) सकाळी अकराच्या सुमारास अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. चाकण पोलिसांनी सबंधित तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, रात्री उशिरापर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

संतोष नगर ( भाम, ता. खेड ) गावचे पोलीस पाटील अजित मच्छिंद्र कड ( वय – 37 वर्षे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय एका अनोळखी तरुणाचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. पोलीस पाटील कड यांनी या बाबतची माहिती चाकण पोलिसांना दिली. चाकण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अनोळखी तरुणाचा पाण्यावर तरंगलेला मृतदेह दिसून आला.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सबंधित बाहेर काढला. या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप ओळख पटली नसून, पोलिसांनी या भागातील कोणी तरुण बेपत्ता आहे का, याचा शोध सुरु केला आहे. चाकण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.