Chakan : ‘शिवशाही’च्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ‘शिवशाही’ने रस्ता ओलांडणा-या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात २ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला. याबाबत गुरुवारी (दि. 13) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ लक्ष्मण वाघमारे (वय 68, रा. डोणगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सोमनाथ महादेव होले (वय 46, रा. सासवड) या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ एसटीचालक आहे. 2 जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास तो पुणे-नाशिक महामार्गावरून शिवशाही (एमएच 09 / ई एम 1720) बस घेऊन जात होता. चाकण येथे रघुनाथ रस्ता ओलांडत होते.

भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.