Maval : उर्से खिंडीच्या दुतर्फा नाल्याला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

एमपीसी न्यूज- उर्से खिंडीच्या दुतर्फा सुरक्षा लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम व रस्त्याच्या दुतर्फा नाल्याला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी संकल्प फाउंडेशनतर्फे यांच्या वतीने करण्यात आली.

एमएसआरडीसी पुणे उपअभियंता सी जी जाधव यांना संकल्प फाउंडेशनचे संस्थापक माजी उपसरपंच प्रदीप धामणकर, भारत ठाकूर, राजू पठाण, किरण राऊत यांच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. उर्से-चाकण राष्ट्रीय मार्गावरुन २४ तास औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक सुरु असते. तसेच द्रुतगती व महामार्गाची वाहतुक या मार्गाने होते. पवन मावळातील गावांना वडगाव व तळेगाव दाभाडे येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. २४ तास या मार्गावर वाहतूक सुरु असल्याने पावसाळ्यात उर्से खिडीच्या दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत.

एमएसआरडीसीच्या वतीने सुरक्षा लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम अनेक महिन्यांपासून मंद गतीने सुरु आहे. ते काम त्वरित पूर्ण करावे.तसेच या खिंडीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा नाले बांधले आहेत. पण त्या नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अचानक नाल्यात जाऊन पलटी होऊन अपघात होत आहेत. या अपघातात अनेकाजण गंभीर जखमी होऊन.पावसाळ्यात हा मार्ग निसरडा व चिखलमय होत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत.

या मार्गाला दुभाजक बसवून वाहतूक एकेरी करावी.उर्से खिंडीच्या मार्ग धोक्याचा झाला असून लोखंडी सुरक्षा जाळ्या व नाल्याला संरक्षक कठडे त्वरित बसविण्याची मागणी संकल्प फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.