BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : काम शिकवण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – काम शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक निर्माण करून तिचा विनयभंग केला. ही घटना म्हाळुंगेमधील कलाजनसेट कंपनीत घडली.

कसमचंद पाईकराय (रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कसमचंद हा म्हाळुंगे गावातील कलाजनसेत कंपनीमध्ये सिक्युरिटी सुपरवायझर आहे. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या दिवशी त्याने पीडित महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.

तसेच तिला पंचिंग मशीन शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित महिलेने गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.