Chakan : कोरोनाच्या आधी आम्ही भूकेने मरायचे का?; संतप्त महिलांचा सवाल

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये रविवारी (दि. २६) दुपारी एकच्या सुमारास नाणेकरवाडी भागातील महिला मोठ्या संखेने घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. चाकण पोलीस ठाण्याच्या दिशेने निघालेल्या या महिलांकडे चौकशी केली असता घरात काहीही शिधा नसल्याने गावाकडे जाण्याची परवानगी घेण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाल्याचे संबंधित महिलांनी सांगितले.

कोरोनाचे संकट देशावर घोंघावत असताना त्यापासून वाचण्याचा लॉकडाऊन हाच उपाय आहे. कोरोनाचा फैलाव देशभर अधिक होण्याचा धोका असल्यामुळे स्थलांतरित मजुरांनी संयम बाळगून लॉकडाऊनला आज पर्यंत सहकार्य केले. मात्र, घरातील शिधा संपला असल्याने या मजूर कुटुंबांची घुसमट सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

अनेक नेतेमंडळीकडून कुठे मास्क, अन्नधान्य, भोजनाची पाकिटे वाटप केले जात आहे. मात्र, बहुतांश वाटप करणारे नेते मंडळी मोजक्या गरजू लोकांना वस्तूंचे वाटप करतात. त्यानंतर या घटनेचे फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकले जातात.

प्रशासनही सर्वाना मदत करीत असल्याचा दावा करण्यात मागे नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी पुरवठा झाल्याचा आभास निर्माण करण्यात येत असला तरी जमिनीवरील चित्र फार वेगळे असल्याचं विदारक वास्तव उद्योग नगरी चाकण पंचक्रोशीत समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1