Chakan : बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच महिन्याचा संपूर्ण पगार मागितला. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 22 मार्च ते 4 जून 2019 या कालावधीत खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली.

पती प्रवीण दौंडकर, सासू कमल दौंडकर, सासरे जानकू दौंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांना बंगला बांधायचा असल्याने पीडित महिलेकडे माहेरहून हुंड्याचे पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. महिला नोकरी करत असल्याने तिचा संपूर्ण पगार सासरच्यांना देण्यास सांगितले.

यावरून आरोपींनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. सासूने पीडित महिलेला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. सासरच्या छळाला कंटाळलेल्या महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.