Chakan : निवडणूक आयोगाची भरारी पथके अलर्ट!

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पुणे जिल्ह्यतील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदार संघामध्ये भरारी पथक दक्ष झाले असून आत्तापर्यंत लाखो रुपयांची रोकड भरारी पथकांनी जप्त केली आहे. 

आचारसंहिता भंगाचे तब्बल दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. शिरूर मतदार संघातही मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नेमलेली भरारी पथके या भागात महामार्गांवर अचानक अवतरू लागली आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर सकाळपासून भरारी पथकाने अनेक वाहनांची कसून तपासणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.