BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : विजेच्या धक्क्याने इलेक्ट्रिक टेक्निशियन कामगाराचा मृत्यू; मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विजेचा धक्का लागून इलेक्ट्रिक टेक्निशियनचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी कुरुळी येथील उच्चदाब वाहिनीच्या खांबाजवळ घडली.

अशोक संभाजी सिंधीकुमठे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी निलेश भागवत काचे (वय 29, रा. शिवे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शैलेश ठाकूर (रा. पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक हे आरोपी शैलेश याच्याकडे टेक्निशियन म्हणून काम करत होते. शैलेश महावितरणचा ठेकेदार आहे. कुरुळी येथील उच्चदाब वाहिनीच्या खांबाजवळ काम करत असताना ठेकेदार शैलेश याने अशोक यांना सुरक्षेची साधने दिली नाहीत. त्यामुळे विजेचा धक्का लागून अशोक यांचा म्रुत्यु झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3