BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : नोकराकडून कॉन्ट्रॅक्टरला पावणेचार लाखांचा गंडा

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कार्यालयातून धनादेश (चेक)ची चोरी करून आरटीजीएसद्वारे 3 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार 2 एप्रिल ते 1 जून या कालावधीत ज्ञानदा सिटी शिक्रापूर रोड येथे घडली.

भगवान नारायण पोखरकर (वय 42, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकास चंद्रकांत मलघे (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. विकास त्यांच्या कार्यालयात नोकरी करतो. विकास याने भगवान यांच्या कार्यालयातून एक धनादेश (चेक) चोरी केला. त्याने आरटीजीएस द्वारे 3 लाख 80 हजार रुपये काढून भगवान यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.