Chakan : पारंपारिक भात झोडणीला सुरुवात

एमपीसी न्यूज – खेड लगतच्या पश्चिम भागात असलेल्या वाकी तर्फे वाडा भागात पारंपारिक पद्धतीने भात झोडणीच्या कामात शेतकरी मग्न आहेत.

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने उत्पादन बेताचे आहे. त्यामुळे भात झोडणीसाठी यंत्रे-मजूर आणण्यापेक्षा शेतकरी कुटुंबे स्वतः घाम गाळून ही कामे करीत असल्याचे स्थानिक भात उत्पादक शेतकरी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.