Chakan : ट्रकचालकाला अडवून लुटणा-या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव-शिक्रापूर रोडने जात असलेल्या ट्रकचालकाला कारमधून आलेल्या चोरटयांनी अडवून मारहाण करून लुटले. यातील पाचही आरोपींना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.

सोमनाथ बाळू गायके (वय 20), अक्षय बाळू गायके (वय 24), कबीर उत्तम गायकवाड (वय 20), अभिषेक बुद्धसेन पांडे (वय 20, सर्व रा. खालूंब्रे, पवारवाडी, ता. खेड), विष्णू अशोक राठोड (वय 21, रा. म्हाळुंगकर चौक, म्हाळुंगे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोमनाथ किसन वनवे (वय 34, रा. करंजडे, पनवेल) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ ट्रकचालक आहेत. ते त्यांचा एम एच 23 / डब्ल्यू 3029 हा ट्रक तळेगावकडून शिक्रापूरच्या दिशेने जात होते. ते म्हाळुंगे येथे बजाज कंपनीच्या गेटसमोर आले असता पांढ-या कारमधून आरोपी आले. त्यांनी कार सोमनाथ यांच्या ट्रकला आडवी लावली. ‘तू आमच्या गाडीला का ठोकले?’ असे म्हणून आरोपींनी सोमनाथ यांना मारहाण करत मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.