Chakan : जमिनीच्या जुन्या वादातून पाच जणांची मायलेकाला मारहाण

एमपीसी न्यूज – जमिनीच्या जुन्या वादातून पाच जणांनी मिळून मुलगा आणि त्याच्या आईला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

स्वप्नील भगवान येळवंडे (वय 21, रा. निघोजे, ता. खेड) यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद तुळशीराम येळवंडे, तन्मय दत्तात्रय येळवंडे, दत्तात्रय तुळशीराम येळवंडे, वैशाली गोविंद येळवंडे, जयश्री दत्तात्रय येळवंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची जमिनीच्या कारणावरून मागील काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी फिर्यादी, त्यांची आई आणि भाऊ घरासमोरील ओट्यावर बसले होते.

त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने लोखंडी रॉड तर गोविंद आणि तन्मय यांनी लाथाबुक्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. आरोपी वैशाली आणि जयश्री यांनी फिर्यादी यांच्या आईचे डोजयचे केस ओढून हात पिरगळुन मारहाण केली. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.