Chakan : वेअर हाउसमधून सव्वा चार लाखांचे मोबाईल चोरीला

ही घटना 7 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता सावरदरी येथील महिंद्रा कंपनीच्या वेअर हाउसमध्ये उघडकीस आली. : Four and a half lakh mobile phones were stolen from the ware house

एमपीसी न्यूज – वेअर हाउसमधून अज्ञातांनी चार लाख 23 हजार 981 रुपये किमतीचे कंपनीचे मोबाईल चोरून नेले. ही घटना 7 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता सावरदरी येथील महिंद्रा कंपनीच्या वेअर हाउसमध्ये उघडकीस आली.

याप्रकरणी धैर्यशील उमराव पवार (वय 35, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 11) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सावरदरी येथे महिंद्रा कंपनीचे वेअर हाउस आहे. त्या वेअर हाउसमध्ये फिर्यादी पवार व्यवस्थापक म्हणून काम करतात.

7 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता त्यांच्या वेअर हाउसमधून 4 लाख 23 हजार 981 रुपये किमतीची मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. वेअर हाउसमध्ये काम करणा-या कामगारांनी मोबाईल चोरल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.