Chakan : कंपनीमधून चार लाखांच्या केबल वायर चोरल्या

एमपीसी न्यूज – कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून कंपनीत प्रवेश करून 4 लाख 11 हजार 712 रुपयांच्या वेल्डिंग मशीनच्या केबल, कनेक्टर आणि लग्ज असा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी आठच्या सुमारास कुरुळी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी तुषार श्रीराम वाडेकर (वय 35, रा. वारजे माळवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार यांची खेड तालुक्यातील कुरुळी येथे प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. रविवारी कंपनी दुपारी पाच वाजता बंद केली. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून पत्रा वाकवला. त्यावाटे कंपनीत प्रवेश करून कंपनीत असलेले 47 वेल्डिंग मशीनच्या केबल, केनेक्टर व लग्ज असा एकूण 4 लाख 11 हजार 712 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.