BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : तलवारीचा धाक दाखवून चौघांनी दोन दुचाकीस्वारांना लुटले

एमपीसी न्यूज – चौघांनी मिळून तलवारीचा धाक दाखवून रस्त्याने जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना लुटले. दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण पंधरा हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरून नेले. या घटना रविवारी (दि. 9) रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान चाकण परिसरात घडल्या.

पवन नामदेव एकशिंगे, विश्वजीत बाबुराव लोंढे, शुभम नामदेव शेटे, अक्षय संदीप चव्हाण सर्व रा. घरकुल चिखली अशी चार चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात हिरालाल सुखराम धरकार (वय 38, रा. हिंजवडी) आणि लक्ष्मण जेजेराव जाधव (वय 23, रा. खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • हिरालाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिरालाल रविवारी रात्री दहाच्या सुमारास माळुंगे गावच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवरून जात होते. ते बजाज कंपनी समोर आले असता, चार चोरटे दोन दुचाकीवरून आले. त्यांनी हिरालाल यांना तलवारीचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला.

लक्ष्मण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खराबवाडी येथे सिमेंटच्या पाण्याच्या टाकीजवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2