Chakan Fraud Case : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 56 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंत्राटदाराकडे आर्थिक गुंतवणूक (Chakan Fraud Case) केल्यास चांगला फायदा होईल. परतावा चांगला मिळेल, असे आमिष दाखवून 56 हजार 600 रुपयांची महिलेची फसवणूक केली असल्याचा प्रकार 12 मार्च ते 20 मार्च या कालावधीत शिक्रापूर रोड चाकण येथे घडला.

दीपा विनोद खुराणा (वय 68, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप उत्तरेश्वर पवार (रा. चाकण. मूळ रा. बार्शी नाका, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MSEB : एमएसईबी मधून बोलत असल्याचे भासवून ऑनलाइन चार लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने (Chakan Fraud Case) तो रोडवेज सोल्युशन इंदिरा कंपनी कोंढवा या रस्ते बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीत कामाला असल्याचे फिर्यादीला सांगितले. रस्ते बनविणाऱ्या मशिनरीच्या कुलंट वैगेरे मेंटेनन्स बघण्याचे काम आम्ही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असते. ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे असून, त्यांना आर्थिक मदत केल्यास ते आपल्याला चांगला परतावा देतील, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून 56 हजार 600 रुपये घेऊन त्याचा अपहार व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.