Chakan gang arrested : पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज : म्हाळुंगे येथील कुरूळी गावच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकायच्या तयारीत असणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.(Chakan gang arrested) ही कारवाई गुरुवारी (दि.29) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास करण्यात आली.

रोहन मोहन शिंदे (वय 21 रा.चाकण), बालाजी संभाजी फत्तेपुर (वय 19 रा.आंबेठाण, मुळ उस्मानाबाद) व संदेश दत्ता जगताप (वय 19 रा.आंबेठाण, मुळ उस्मानाबाद)अशी अटक आरोपींची नावे असून त्यांचे साथीदार सनी व बबलु हे फरार झाले आहेत.

Film elections : चित्रपट महामंळाच्या निवडणुकीत पत्रकार शरद लोणकर यांची उडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी गावातील मुंगी कंपनी ते कुरुळीगावठाण या मार्गावरील एच.पी पेट्रोलपंपावरील कामगार रात्री दिवसभराची रोकड घेऊन जातो. याची पूर्ण माहिती काढून त्याच्यावर पाळत ठेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत ही टोळी होती.(Chakan gang arrested) त्या आधीच पोलिसांना त्यांच्या हालचालीची खबर लागली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्यांना अटक केले. यावेळी आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी कोयता, मिरचीपूड, लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, दोन मोबाईल असे एकूण 17 हजार 895 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार झाले. त्याचा तपास चाकण पोलीस घेत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.