Chakan: टीसीआय कंपनीत कामगार ठेक्यावरुन धुमशान; मनसे नगरसेविकेच्या पतीसह महाराष्ट्र राज्य माथाडीच्या चिटणीसावर गुन्हा

वाहनांची तोडफोड; सोळा जणांना अटक

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक वसाहतीतील रोहकल ( ता. खेड ) हद्दीतील टीसीआय कंपनीत कामगार ठेका मिळविण्यासाठी आलेल्या जमावाने कामगारांना बाहेर हाकलून कंपनीत माल चढ-उतारासाठी आलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (दि.16) दुपारी साडेबाराचे सुमरास घडली. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे चिटणीस संग्राम पाटील आणि वडगाव नगरपरिषदेच्या मनसेच्या नगरसेविकेचे पती रुपेश म्हाळसकर यांच्यासह वडगाव मावळ, चिंचवड, निगडी परिसरातील सोळा जणांवर रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवाजी महादेव वाटेकर ( वय 64, रा. काळूस, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे चिटणीस संग्राम सर्जेराव पाटील ( रा. आंबेगाव), वडगाव नगरपरिषदेच्या मनसेच्या नगरसेविकेचे पती रुपेश शंकरराव म्हाळसकर (रा. वडगाव मावळ) , यशपाक किसन चौधरी ( रा. निगडी), राजू भानुसरे ( रा. शीलाटणे), विलास साबळे, कृष्णा पवार, अविनाश म्हाळसकर, विनायक मोडवे, शिवानंद कटनाईक, नवनाथ शिवेकर, प्रदीप कड, किरण पवार, बालाजी पवार ( सर्व रा.वडगाव मावळ) , देविदास कैलास देवकाते ( रा. चिंचवड) या सोळा जणांवर भा.दं. वि.कलम 52,143,147,149,504,506 आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पुढील तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.