Chakan : स्टोअररूमच्या भिंती फोडून सिलेंडर चोरले

एमपीसी न्यूज – चाकण येथे वाकी गावच्या हद्दीत एका स्टोअररूमच्या भिंती फोडून चोरट्यांनी गॅस सिलेंडरच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 19) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.

मोहन श्रीराम वैद्य (वय 54, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन यांचे वाकी गावच्या हद्दीत संतोषनगर येथे गॅस सिलेंडरचे स्टोअररूम आहे. या स्टोअररूमच्या भिंती फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 63 हजार 296 रुपये किमतीच्या गॅस सिलेंडरच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या चोरून नेल्या. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्टोअररूम उघडते वेळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.