_MPC_DIR_MPU_III

Chakan : गॅस रिपेअरिंग दुकानाची तोडफोड करून दुकानदाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गॅस रिपेअरिंग दुकानदाराला त्याचे दुकान बंद करण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच त्याच्या दुकानाची व मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास मेदनकरवाडी मधील बोरजाईनगर येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV

मीनानाथ किसन कराड (वय 42, रा. चाकण. मूळ रा. माधव नगर, मनमाड. ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुक्ता बोरा, अर्जुन लष्करे, चंद्रकांत राजगीरवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीनानाथ यांचे मेदनकरवाडी मधील बोरजाईनगर येथे गॅस रिपेअरिंगचे दुकान आहे. मीनानाथ यांचे मित्र अमोल गोसावी यांच्याकडे आरोपींनी मीनानाथ यांचे गॅस रिपेअरिंगचे दुकान बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर, बुधवारी मीनानाथ यांनी त्यांचे दुकान सकाळी उघडले. त्यावेळी आरोपी दुकानात आले. त्यांनी ‘तू आज दुकान का बंद केले नाही ?’ असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी अर्जुन याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. मुक्ता यांनी दुकानातील चार किलो गॅसची टाकी उचलून मीनानाथ यांच्या डोक्यात मारली. यानंतर मीनानाथ दुकान सोडून पळून गेले. आरोपींनी मीनानाथ यांच्या दुकानाची आणि मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.